+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com COVID 19 Guidelines
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

वाघांची शिकार व तस्करी रोखण्याचे आव्हान!

वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून तो संपूर्ण पर्यावरणाचे प्रतीक आहे. देशभरात 'वाघ वाचवा' मोहीम जोरात असतानाच गेल्या अनेक वर्षांत सुमारे हजारो वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावले आहेत. वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला आहे परंतु हाच वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीवनाच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.
सन २००० पासून जगभरात २३०० हून अधिक वाघांची शिकार करून त्यांच्या अवशेषांची तस्करी झाल्याचा अहवाल 'ट्रॅफिक' या प्रतिष्ठित व्याघ्रसंवर्धन संस्थेने जाहीर केला आहे. सन २००० पासून दरवर्षी १२० म्हणजेच आठवड्याला दोन याप्रमाणे वाघांची शिकार होत असून, वाघांच्या संवर्धनाचा लढा आपण हरत चाललो आहे असे दिसून येते. भारतात वाघांची संख्या चांगली असूनही पूर्वीपासून चालत आलेल्या वाघांच्या शिकारीमुळे आज ही वाघांची संख्या तेजीने कमी होत आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या मोहीम राबवत आहे. यातील महत्वाची मोहीम म्हणजे 'वाघ वाचवा' मोहीम. या मोहिमेअंतर्गत आज भारतात वाघाच्या शिकारीचे प्रमाण कमी होत असताना दिसून येत आहे. सन १९०० मध्ये जगभरातील वाघांची संख्या एक लाख होती. मात्र, सन २०१८ पर्यंत ती ३९०० पर्यंत घसरली. सन २००७ मध्ये भारतात १४११ वाघ होते. त्यापैकी महाराष्ट्रात १०३ वाघ असल्याचे पाहणीत आढळले होते. सन २००० ते २०१८पर्यंत ३२ देशांमध्ये आढळलेल्या तस्करीच्या अवशेषांवरून किमान २३५९ वाघांची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे सन २०१० च्या ३२०० संख्येहून त्यामध्ये आता थोडी वाढ झाली आहे.
तस्करीसाठी अनेक प्राण्यांचा नाहक बळी घेतला जातो, पण या सर्वांमधून वाघांच्या अवशेषांची तस्करी अधिक केली जाते. शोभेच्या वस्तू, औषधे बनवण्यासाठी तसेच व्यवसायासाठी वाघांची कातडी, दात, हाड, नखं या अवशेषांची तस्करी केली जाते. हे अवशेष विकून बक्कळ पैसे कमावला जातो. पण यासाठी आपल्या देशाची शान असलेल्या वाघाची शिकार केली जाते. या वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांची शिकार थांबवण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहेत. आज भारतात ५० व्याघ्र प्रकल्प आहेत. वन्यजीवांसाठी अनेक अभयारण्ये आहेत. महाराष्ट्रात १६ राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यात वाघांना त्यांच्या हक्काचे नैसर्गिक निवास स्थान मिळत आहे.



Comments



    Comments: 0

Recent Posts

img Sal Tree...   January 10, 2022
img Oriental Garden Lizard...   January 06, 2022
img Wolf Spider...   December 25, 2021
img Green or Bamboo Pit Viper...   December 18, 2021
img Guide Traning At jharana Jungle Loadge...   December 11, 2021
Back To Top