Enquiry Now
+91 7755983051 / 9028269571 reservation@jharanajunglelodge.com
img

वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' सर्वोत्तम पर्याय

एका चांगल्या करियरसाठी किंवा भविष्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम क्षेत्र आहे असे म्हणता येईल. त्यातीलच वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा प्रकार अतिशय रोमांचकारी व साहसी आहे. या फोटोग्राफी मुळे तुम्हाला तुमच्या लेन्सवर एक्सपिरिमेंट करता येते आणि शिवाय यामुळे तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे निसर्गाबद्दल व प्राण्यांबद्दल जाणून घेण्याचे पॅशन हवे. फोटोग्राफी कोर्सच्या व्यतिरिक्त तुम्ही वाईल्डलाईफ फोटोग्राफीची प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा घ्यायला हवी. तुमच्याकडे फक्त डीएसएलआर कॅमेरा असणे पुरेसे नाही, तुम्हाला प्रत्येक कॅमेरा अँगल आणि फोटोग्राफीच्या इतर फंक्शनचे सखोल ज्ञान हवे. भारतात त्याचबरोबर इतर देशांमध्येही अशी इतर अनेक जंगलं आहेत जिथे तुम्हाला तुमची वाईल्डलाईफ फोटोग्राफी स्किल डेव्हलप करता येईल.  


तुम्ही अनेक जंगलांमध्ये जंगल सफारीचा प्लॅन करू शकता. अनेक जंगलांमध्ये वाईल्डलाईफ फोटोग्राफर्ससाठी वेगळ्या जंगल सफारी आखलेल्या असतात. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फोटोग्राफी प्लॅन आखावा लागेल. भारतामध्ये प्राण्यांसाठी वेगळे अभयारण्य आहेत, जेथे तुम्ही तुमच्या फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या प्राण्यांची निवड करू शकता. जर तुम्हाला वाघांची फोटोग्राफी करायची असेल तर 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हा तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय ठरेल. जर तुम्हाला रँडम फोटोज हवे असतील तर तुम्ही कोणतेही जंगल निवडू शकता. ज्या भागात अधिक प्राणी दिसू शकतात अशा भागांबद्दल तुम्ही वन अधिकाऱ्यांशी  किंवा रेंजर्ससोबत बोलू शकता. 
फोटोग्राफी सेशनला जाताना तुम्हाला फोटोग्राफीच्या दृष्टीने पूर्णपणे तयार होऊन जावे लागते. जंगलातील वातावरणाशी समन्वय साधणारे व योग्य रंगाचे कपडे परिधान करा. तुमचे संपूर्ण शरीर झाकले जाऊन तुम्हाला उन्हापासून सुरक्षित ठेवतील असे कपडे घाला. जंगलातील कीटकांपासून व मच्छरांपासून बचावासाठी संपूर्ण शरीरावर मॉस्किटो रेपेलन्ट लावा. पुरेसे पाणी व खाद्य पदार्थ सोबत ठेवा. कठीण परिस्थितीसाठी टॉर्च व काठी सोबत ठेवा. गरजेसाठी जंगलाचा नकाशा सुद्धा सोबत घ्या. जंगलात जाण्याआधी वन अधिकाऱ्यांशी वातावरणातील बदलांबद्दल बोलून घ्या. लक्षात घ्या की तुम्ही निसर्गाशी जवळीक साधायला जात आहात, नुकसान पोहोचवायला नाही. याबरोबरच अशा फोटोग्राफर्स साठी ताडोबा जवळील 'झरना जंगल लॉज'तर्फे फोटोग्राफी कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे २०१९ ते ५ जून २०१९ पर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. तरी इच्छूक फोटोग्राफर्सनी जरूर सहभागी व्हावे. 

Our Guests Away

We all had a very good time in this resort.All the staff was very helpful & Courteous.Rooms & Food was Excellent.We would love to visit again.

Madhav Gore
Pune

One of the best time all of us ever had! You made us feel at home away from home. From welcome to goodbyes; every memory makes us smile!Thank you for mouth watering food & hospitality! We enjoyed a lot.

Shreya
Nagpur

The ambience is awesome, very soothing & calm environment. Good Hospitality

Mr.Y.Ramani

It was a great stay. The food & room ambience was awesome. Jungle safari experience was excellent

Rajdatt Nagis

It was a pleasure being here with my family.We enjoyed every moment thoroughly.Hospitality, service & food was excellent.

Ishan Mhaisane
Back To Top