+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

ताडोबा राष्ट्रीय उद्यानात काय-काय कराल???

ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य त्यातील व्याघ्र प्रकल्पासाठी सर्वश्रूत आहे. जेव्हापासून तेथे व्याघ्र प्रकल्प सुरु झालं तेव्हापासून तेथे पर्यटकांची भाऊगर्दी सुरु झाली आहे. फक्त वाघ नाहीत तेथे १९५ जातीचे पक्षी, विविध वनस्पती, प्राणी आणि वन्यजीवन आढळतात. जी हौशी पर्यटकांची पावले आपोआप ताडोबा अभयारण्याकडे वळवतात. आता आपण पाहू यात ताडोबा अभयारण्यात पाहण्यासारखे अजून काय आहे...

१. जंगल सफारी... ताडोबा अभयारण्यात सहा गेट आहेत, ती पुढीलप्रमाणे मोहरली गेट, कुस्वांडा गेट, कोलारा गेट, नवेगाव गेट, पंगडी गेट, झरी गेट. या गेटमधून तुम्ही जंगल सफारीसाठी जाऊ शकता आणि येथील ८० हून अधिक वाघांना पाहू शकता.

२. गावाला भेट देणे... ताडोबा अभयारण्याच्या सभोवताली अनेक छोटी गावं आणि आदिवासी पाडे आहेत. येथे जाऊन आपण त्यांच्याबद्दल माहिती, त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेऊन शकतो.

निसर्गाच्या कुशीत स्वछंद फिरू शकतो... ताडोबा अभयारण्यात आगळी वेगळी आणि मोठ-मोठी झाडे आहेत. अशावेळीस आपण सांजवेळी किंवा सकाळच्यावेळी निसर्गाच्या कुशीत स्वछंद फिरू शकतो.

पक्ष्यांच्या जाती पाहू शकतो... पूर्वी सांगितल्याप्रमाणे येथे शेकडो जातीचे पशू-पक्षी आहेत. अशावेळेस आपण ताडोबा अभायारण्यात पक्षीप्रेमी म्हणून जाऊन त्यांच्याबाबत अभ्यास करु शकता.

मला वाटतं तुम्ही आतापर्यंत बॅग भरुन ताडोबाला जायला तयार झाला असाल. तर वाट कसली पाहता पुढील लिंकवर क्लिक करा jharanajunglelodge.com आणि तुमचे ताडोबामधील वास्तव्य आजच बूक करा.Comments

Login to Comment

    Comments: 0
Back To Top