+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत..

ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत...

 

ताडोबा जंगल म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं महाकाय आणि घनदाट जंगल आणि त्यामध्ये खेळणारे, आपल्या कुटुंबासमवेत बागडणारे वाघ आणि अन्य प्राणी... अशा वन्यप्राण्यांना काही अंतरावरुन पाहण्यासाठी आणि या साहसाचा अनुभव घेण्यासाठी 'झरना जंगल लॉज'ने तुमच्या-आमच्यासारख्या पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी सुरु केली आहे; पण ताडोबा जंगल सफारीचे हे साहस उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बाबी करायच्या टाळल्या पाहिजेत... त्या काय आहेत पाहू यात पुढीलप्रमाणे...

 

हे नक्की करा...

 

तुमचे कपडे जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेतः ताडोबा जंगल सफारीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे कपडे निवडाल ते जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेत किंवा तुमचे कपडे लष्कराच्या गणवेशासारखे असले तर उत्तमोत्तम. कारण काही गडद किंवा उठावदार रंगानी प्राणी गोंधळू शकतात म्हणून शक्यतो, अशी कपडे परिधान करावीत.

 

कॅमेराः जंगल सफारीचा अनुभव तुमच्याकडे असावा यासाठी कॅमेरासोबत ठेवा. याद्वारे तुम्ही चांगले फोटोही काढू शकता.

 

शांत रहाः जंगलात शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्राण्यांना मानवांचा गोंधळ आवडत नाही तसेच तुम्ही थोडाजरी आवाज केलात तर ते दृष्टीआड होतील आणि तुम्ही त्यांना पाहू शकणार नाही.

 

गाईडसोबत रहाः जंगल सफारीदरम्यान गाईडसोबत रहा. त्याला जंगलाची, तिथल्या प्राण्यांची ठोस माहिती असते. तो तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो.

 

बॅग हलकी ठेवाः प्रवास करताना जेवढी लागतील तेवढेच कपडे घ्या, बॅग हलकी ठेवा, असे सल्ले आपण ऐकत असतो. जंगल सफारीमध्येही हेच लागू होतं... जंगलात ज्या वस्तूंची गरज असेल त्याच वस्तू तुमच्या बॅगेत ठेवा.

 

हे सोबत ठेवायला विसरू नकाः जंगल सफारी दरम्यान गॉगल, टोपी आणि सन्सक्रिन लोशन सोबत बाळगा. तसेच जंगलातली बुट वापरा जेणेकरुन आपल्या पायाला इजा होणार नाही.

 

प्रथमोपचार किटजवळ ठेवाः जंगल सफारीदरम्यान तुम्हाला किंवा तुमच्यापैकी कोणाला काहीही होऊ शकतं. त्याची काळजी म्हणून प्रथमोपचार किटसोबत ठेवा.

 

हे करणे टाळाच...

 

प्राण्यांना खायला देऊ नयेः जंगल सफारीदरम्यान कोणत्याही प्राण्याला खायला देण्याचा प्रयत्न करु नये. प्राणी कसाही वागू शकतो, प्रसंगी बिथरु शकतो. म्हणूनच प्राण्यांना खायला देऊ नये.

 

जंगलात कचरा करु नयेः आपल्या घरात कोणी कचरा केला तर आपल्याला चालेल का? नाही ना. जंगल हे प्राण्यांचं घर आहे. आपणही तेथे कचरा करु नये.

 

प्राण्यांपासून दूर रहाः जंगल सफारीमध्ये प्राणी तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतील; तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच तुम्ही प्राण्यांपासून दूरच रहा. 

 

मुलांबाबत घेण्याची विशेष काळजीः नवजात बालके तसेच छोट्या मुलांना जंगल सफारीसाठी आणू नये. त्यांना शांत करणे फार अवघड असते म्हणून लहान मुलांना न आणलेलेच बरे.

 

धुम्रपान करु नयेः जंगल सफारी किंवा जंगलात धुम्रपान करण्याचे टाळा. आपण टाकलेल्या सिगारेट किंवा आगपेटीच्या काडीमुळे मोठा वणवा पेटू शकतो.

 

मोबाईल सायलेंट मोडवर ठेवाः सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. स्वतःला आणि दुस-यालाही त्याचा त्रास होता कामा नये.Comments

Login to Comment

    Comments: 0
Back To Top