+91 7755983051 / 9028269571 reservation@jharanajunglelodge.com

img

वाघांबद्दल तुम्हाला 'या गोष्टी' माहिती आहेत काय?

जंगलातील मोठे मांजर ज्याला म्हंटले जाते अशा वाघाने जंगलात डरकाळी फोडली किंवा त्याची झलक जरी दिसली तरीही जंगल सफारीवर असणाऱ्या लोकांची एक्साइटमेंट, कुजबुज किंवा आवाज वाढतो. तथापि, जेव्हा वाघ दिसतो तेव्हा सर्व खूप उत्साही होतात आणि त्याचे फोटोज काढू लागतात. एखाद्या प्राण्याला प्राणीसंग्रहालयात पाहण्यापेक्षा थेट जंगलात पाहणे हे अधिक मनमोहक असते. पण जेव्हा आपण जंगलात त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या हद्दीत प्रवेश करतो तेव्हा आपण त्यांच्या क्षेत्राचे सर्व नियम पाळले पाहिजेत. आपण त्यांचे वातावरण आणि त्यांची मोकळीक स्वीकारणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मानव-प्राणी संघर्ष हळूहळू नियंत्रित झाला आहे. जंगल वाढविण्यासाठी आणि प्राण्यांची जागा टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

जंगलाचा राजा सिंहाप्रमाणेच वाघ हा सुद्धा एक अतिशय सुंदर असा प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्याने आपल्याला त्याच्याविषयी काही तथ्य समजून घेणे आवश्यक आहे.
वाघ एका पंजाने ही माणसाला मारू शकतो. वाघाशी पंगा घेण्याऐवजी मनुष्याने त्याच्या सौंदर्याविषयी अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर रॉयल बंगाल टायगर्स यांच्या प्रजातीतील नर वाघांचे वजन सुमारे 300 किलोग्रॅम असते. म्हणजे त्यांच्या भव्यतेची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.. बरेच वाघ अंधारातही पाहू शकतात, म्हणजे रात्रीच्या अंधारातही त्यांना दिसते. म्हणूनच ते त्यांची शिकार बिनदिक्कतपणे करू शकतात आणि रात्रीच्या वेळी जंगलात त्यांच्या जागेत फिरू शकतात.

वाघांना पाणी खूप आवडते, म्हणूनच त्यांना पाण्यात पोहायला आणि खेळायला खूप आवडते. त्यांचे आयुर्मान जरी २०-२५ वर्षांचे असले तरीही अर्ध्याहून अधिक बछडे हे जन्मल्या जन्मल्याचा थंडी आणि उपासमारीने मारतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना जन्मतःच दिसत नाही. ते जन्मल्याच बघू शकत नाहीत किंवा त्यांच्या आईचा म्हणजेच वाघिणीचा वास देखील घेऊ शकत नाहीत. वाघांच्या समूहाला 'स्ट्रीक' किंवा 'अँबश' म्हणतात. वाघ शिकत करताना गर्दझाडींमध्ये लपून शिकार करतात. ते सर्व प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात आणि सहसा शिकारीसाठी मानवांवर आक्रमण करत नाहीत. त्यांना एकटे राहायला आवडते आणि सोबतच ते इतर प्राण्यांचे अनुकरण सुद्धा करू शकतात.

तर, आता जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या जंगल सफारीवर गेलात तर ही सर्व तत्थ्ये तुम्हाला आठवतील आणि त्यामुळे तुम्हाला वाघ हा अधिकच आकर्षक जाणवेल व तुमची सफारी अधिक उत्तम होईल.Comments

Login to Comment

    Comments: 0
Back To Top